न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १४ जाने.) :- एमजीडी इंडिया MILLENNUM चेम्बर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री (MICCI) मिक्कीच्या वतीने रविवार (दि. १३) रोजी नवी मुंबईतील वाशी येथे एक दिवसीय व्यवसायिक परिषदेचे (BIZCON-२०१९) चे आयोजन करण्यात आले होते. युवा उद्योजक अमित गोरखे यांना या परिषदेस आमंत्रित करण्यात आले होते.
मिटकॉन संस्था, वेंचर कैपिटल, विविध प्रोजेक्टस बनवणाऱ्या संस्था, उद्योजक अमित गोरखे, चीफ मैनेजर शारजाह छेद व आदी या परिषदेस उपस्थित होते.
परिषदेस संबोधित करताना अमित गोरखे म्हणाले की, ”आपल्यातील नव-उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, ज्यांना व्यवसायिक क्षेत्रात प्रवेश मिळवायचा आहे. त्यांना मार्गदर्शन मिळावे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच उद्योजक व नवउद्योजक यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती कशी मिळेल? त्यांना त्यांच्या उद्योगासाठी शासनाकडून सवलती कशा मिळतील? व्यवसायासाठी भांडवल उभारणी कशा प्रकारे करावी? यासंदर्भात अद्ययावत माहितीची उद्योजकांना आवश्यकता भासते. याबाबत उद्योजक अमित गोरखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य व्यवस्थापक शारजाह छेद यांनी निर्यातीच्या संधी बद्दल माहिती दिली











