न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १४ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहरात ३ ते ४ महिन्यांपूर्वी डेंगू व स्वाईन फ्लू खूप मोठ्या प्रमाणात फैलावला होता. अनेक नागरिक भयभीत झाले होते. कारण रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती, अश्या वेळी समाजप्रबोधन करण्याची गरज असते व हेच काम महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून प्रभाग क्र १८ चिंचवडगाव येथे केले व करीत आहेत.
बॅनर, पत्रके, मेसेज व प्रत्यक्ष नागरिकांना भेटून व भित्ती पत्रके चिटकविणे आदीद्वारा गेल्या ३/४ महिने जनजागृती सुरू होती. यामुळे प्रभागात नागरिकांना या आजाराचा जास्त त्रास झाला नाही. या जनजागृतीची व प्रबोधनाची सांगता संपूर्ण प्रभागात महत्वाच्या ठिकाणी पत्रके वाटून, पोस्टर चिटकून, बॅनर लावून करण्यात करण्यात आली. तसेच नागरिकांसोबत सवांद करून नागरिकांच्या प्रतिक्रीया घेण्यात आल्या.
अनेक नागरिक गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या जनजागृती अभियानाची स्तुती करून धन्यवाद देत होते, सूचनाही देत होते, आभार व्यक्त करीत होते. या अभियानात नागरिकांनी आरोग्य कसे सांभाळावे? पाणी बचत, स्वच्छ परिसर आदीवरही जनजागृती करण्यात आली. या अभियानात भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मंडळे, जेष्ठ नागरिक, महिला,युवती आदींनी स्वताहून सहभाग घेतला. या जनजागृतीमुळे डेंगू व स्वाईन फ्लू आदी आजार मोठ्या प्रमाणात आवाक्यात आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत होते. याचे समाधान सर्व कार्यकर्त्यांना वाटत होते.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या नेतृत्वाखाली सौरभ शिंदे अध्यक्ष भाजपा रोजगार पुणे जिल्हा व प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे यांनी संपूर्ण नियोजन केले. नागरिकांनी भविष्यातही आरोग्य निरोगी रहावे व आजार दूर रहाण्यासाठी आपणस माहिती झालेले नियम कायम पाळावेत, असे आवाहन बच्चे व त्यांच्या आरोग्यटीमने यावेळी केले आहे.











