- ‘फी’वरून विद्यार्थ्यांचे प्राचार्याशी वादंग; पोलिसात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२१) :- फी कमी करावी यासाठी विद्यार्थ्यांने काचेच्या दरवाज्यावर धडक घेतल्याने काच तुटून विद्यार्थी व शिपाई कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना (दि. २९) सकाळी अकरा वाजता पिंपरीतील महात्मा फुले शाळेमध्ये घडला.
सकाळी अकरा वाजता विद्यार्थी प्राचार्य कक्षामध्ये त्याच्या मित्रासोबत आला. त्याने प्राचार्यासोबत शुल्क कमी करावे यासाठी वाद घातला. प्राचार्य यांनी त्यांला फी कमी करण्याचे अधिकार मला नाहीत असे सांगितले. तसेच रयत शिक्षण संस्था सातारा व महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार तुम्हाला फी भरावी लागेल. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ज्या बाबींचा वापर झाला नाही त्या बाबींची फी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात माफ करावी. असे असताना ती सवलत तुम्हाला लागू आहे. मात्र उर्वरित फी तुम्हाला भरावी लागले, ती तुम्ही टप्याटप्याऩे भरू शकता असे प्राचार्यांनी सांगितले.
मात्र, यापैकी त्या विद्यार्थ्याला काहीही मान्य नसल्याचा दावा शाळा प्रशासनाने केला आहे. त्यानंतर खाली पडलेला काचेचा तुकडा घेऊन हा विद्यार्थी बाहेर गेला. त्याने काही गैरकृत्य करू नये यासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून एका खोलीत बंद केले. त्यानंतर पोलिसांच्या हवाली केले आहे. हा प्रकार सीटीसीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.