- त्यातून मुलगी गरोदर; चिखली पोलिसाकडून आरोपीला बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२१) :- रुपीनगर येथील एका मंदिराच्या पाठीमागे, एका महाविद्यालयात वारंवार भेटण्यासाठी आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवून बोलाविले.
आरोपीने त्याच्या दुचाकीवरून पीडित मुलीला मोशी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही घटना २० मार्च ते २७ ऑगस्ट या दरम्यान घडली.
मुलगी सहा महिन्यांची गरोदर असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने मंगळवारी (दि. २८) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विठ्ठल मंकाळ पवार (वय २०, रा. ओटास्कीम निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.