- मोबाइल ऑर्डर केला; मिळाला चार्जर अनं केबल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२१) :- अॅमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन माध्यमातून फिर्यादी यांनी १४ सप्टेंबर रोजी १४ हजार ४९९ रुपयांचा मोबाइल ऑर्डर केला. मोबाइलची डिलिव्हरी फिर्यादी यांना १० सप्टेंबर रोजी मिळाली. डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्यांनी मोबाइलचा बॉक्स न उघडता तसाच ठेवला. मात्र पार्सलमध्ये केवळ चार्जर आणि केबलच ग्राहकाला मिळाली.
फिर्यादी यांनी मोबाइल मिळाला नसल्याबाबत अॅमेझॉन कंपनीला संपर्क केला. कंपनीने या प्रकरणाचा तपास करून कळवतो, असे सांगितले. याप्रकरणी विपुल विनोद पाटणी (वय ३३, रा. फेज १, हिंजवडी) यांनी अॅमेझॉन कंपनी आणि डिलिव्हरी देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात मंगळवारी (दि. २८) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.