- डिव्हायडरला दुचाकीची जोरात धडक; दोघांचा जागीच मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२१) :- आकुर्डीतून निगडी ते पिंपरी या मार्गावर दुचाकीने रविवारी (दि. १७) दुपारी जात असताना खंडोबा माळ येथील बीआरटीच्या डिव्हायडरला भरधाव दुचाकीची जोरात धडक बसली.
यात दुचाकीवरील आर्यन नरेंद्र परमार (वय २१, रा. दापोडी), श्वेता अशोक गजभिये (वय २१, रा. दापोडी, मूळ रा. भंडारा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याच दुचाकीची एका मोपेड दुचाकीलाही धडक बसली. दुचाकीवरील दोन तरुणी जखमी झाल्या . डिव्हायडरला दुचाकी धडकल्यानंतर पेट्रोल सांडल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.