- कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणणार; २०० कोटींचे उद्दिष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून परिसरातील मालमत्तांचे जीआयएसद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यातून मिळकत कर चुकविणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे, तसेच नोंद नसलेल्या मिळकतीची नोंद केली जाणार आहे. मिळकत सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकांतर्गत येणाऱ्या सर्व मालमत्तांचे जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) सर्वेक्षण पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने केले जाणार आहे. शहरात साडेचार लाख मिळकती असून, मोठ्या प्रमाणावर मिळकतीची महापालिकेकडे नोंद झालेली नाही. त्यामुळे मिळकत स्वयंमूल्याकन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
तसेच महापालिकेतर्फे जीआयएस प्रणालीचे नागरिकांना भविष्यातील होणारे फायदे लक्षात घेऊन ही प्रणाली राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग व पारदर्शक प्रशासन, जीआयएस प्रणालीद्वारे महापालिका क्षेत्रामधील मिळकतींसाठी सुधारित सेवा देण्यात येणार आहे. कररूपातील उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विविध व्यावसायिक मिळकतीचा शोध घेऊन २०० कोटींचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
सर्वेक्षणासाठी मालमत्तांचे फोटो व इतर आवश्यक माहिती संकलित करण्यासाठी सर्व्हेअर, कर्मचारी नियुक्त केले आहेत. मालमत्ता कर पावती, आधार कार्ड, वीजबिल आदी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत.
– मा. राजेश पाटील, आयुक्त…