- ५५ वर्षीय आरोपीवर पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२१) :- बँड व आर्केस्ट्राच्या पथकात पिडीत महिलेला घेऊन कार्यक्रमांमध्ये गायिका म्हणून आरोपीने काम दिले. आरोपीने फिर्यादी महिलेशी जवळीक वाढवली. ऑगस्ट २०१९ मध्ये आरोपीने फिर्यादीला कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावून घेऊन हिंजवडी येथील एका लॉजमध्ये नेले. तीथे फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
फोटो व व्हिडिओ काढून फिर्यादीला बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच इतर लॉजसह आरोपीच्या चिंचवड स्टेशन येथील ऑफिसमध्ये व हिंजवडीत अनेकवेळा फिर्यादीवर बलात्कार केला. फिर्यादीच्या पतीसही जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित ४२ वर्षीय महिलेने रविवारी (दि. १७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बाळू शिवाजी गव्हाळे (वय ५५, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) याच्याविरोधात भोसरी पोलिसांनी फिर्याद नोंदवून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे.