न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जाने.) :- महापालिकेच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती (१९ फेब्रु.) रोजी दरवर्षी भक्ति शक्ति चौक, निगडी येथे साजरी होत असते. शिवजयंती निमित्त महापालिकेने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे, याबाबत सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा पुणे यांनी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना निवेदन दिले आहे.
यात म्हटले आहे की, दरवर्षी (१९. फेब्रु.) रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती असते. त्या निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम महानगरपालिके च्या वतीने भक्ति-शक्ति उद्यान निगडी येथे तीन दिवस उत्साहात साजरे करण्यात यावेत. गत वर्षी आम्ही सकल मराठा समजा च्यावतीने आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते, सत्तारूढ पक्षनेते, गटनेते यांना व जनसंपर्क व माहिती अधिकारी या सर्वांना आपल्या शहरात शिवजयंती महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात यावी, याकरीता निवेदन दिले होते. परंतु, आम्हाला पालिकेच्या वतीने शासनाचा (दि. ११. नोव्हें. २०१७) चा जी. आर. समोर करून, या पुढे शहरात कोणत्याच जयंतीला निधि दिला जाणार नाही, असे सांगण्यात आले.
त्यानंतर अनेक महापुरुषांच्या जयंतीनिमीत्त संस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम पालिकेच्या वतीने उत्साहात साजरे करण्यात आले. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. याचे आम्ही स्वागत करतो. परंतू, यावर्षीपासून शिवजयंती निमित्त शहरातील सर्व शाळांमध्ये “शिवसप्ताह”साजरा करण्यात यावा. यात आपल्या शाळेत बालशिवाजी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोवाडा गायन स्पर्धा, या सर्व स्पर्धोचे नियोजन करण्यात यावे. तसेच शाळेतील विजेत्या स्पर्धकांना शिवचरित्र पुस्तक, स्मृतीचिन्ह मानधन देण्यात यावे.
तसेच शिवजंतीच्या निमित्ताने भक्ति-शक्ति उद्यान निगडी येथे तीन दिवस उत्साहात प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी येणारे मान्यवर व कलाकार यांचे मानधन, चहापान, भोजन, जाहिरात, फ्लेक्स होल्डिंग, विद्युत रोषणाई, एलईडी स्कीन, बाळशिवाजी, स्मृती चिन्हे, प्रभोधनात्मक पुस्तके, वारकरी मंडळी, ढोलताशा पथक, फोटोग्राफी व विडिओ शूटिंग, जनजागृती, स्टँड आर्ट आदींसाठी खर्च लागणार आहे. यासाठी आम्ही सकल मराठा समाज या कार्यक्रमासाठी वेळोवेळी आपल्या बरोबर आहोत.
तेव्हा आपण या निवेदनाची महापालिकेच्या वतीने दखल घेऊन, या वर्षीपासून (१९. फेब्रु. १९) दरवर्षी भव्य अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून, शिवजयंती उत्सव साजरा करावा. गेल्या वर्षीप्रमाणे आम्हाला यावर्षीही केवळ भुलथापा आश्वासने देऊन, शिवजयंतीबाबत कंजूषी दाखवली तर, आम्हाला नाविलाजाने सर्व शिवभक्तांसह सकल मराठा समाज व समाजातील विविध संघटनांना बरोबर घेऊन, महापालिकेच्या मुख्यालयात तीव्र आंदोलन करावे लागेल, असे सकल मराठा समाज व सर्व शिवप्रेमी पिंपरी चिंचवड शहर व जि. पुणे यांनी या निवेदनात म्हटले आहे.











