न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जाने.) :- महापालिकेच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती (१९ फेब्रु.) रोजी दरवर्षी भक्ति शक्ति चौक, निगडी येथे साजरी होत असते. शिवजयंती निमित्त महापालिकेने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे, याबाबत सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा पुणे व माजी नगरसेवक मारुती भापकर यांचे शिष्टमंडळ निवेदन घेऊन महापौर राहुल जाधव यांना भेटले. त्यावेळी या शिष्टमंडळास महापौरांकडून अपेक्षित वागणूक मिळाली नाही. उलट त्यांना महापौरांनी अव्हेरले. या वागणुकीचा जाब माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पत्राद्वारे महापौर यांना विचारला आहे.
भापकर यांनी या पत्रात म्हटले आहे की, ”श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती १९ फेब्रुवारी या तारखेला शिवजयंती असते. त्या निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम महानगरपालिकेच्या वतीने भक्ति-शक्ति उद्यान निगडी येथे तीन दिवस उत्साहात साजरे करण्यात यावेत. गत वर्षी आम्ही सकल मराठा समजाच्या वतीने आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते, सत्तारूढ पक्षनेते, गटनेते यांना व जनसंपर्क व माहिती अधिकारी या सर्वांना आपल्या शहरात शिवजयंती महानगर पालिकेच्या वतीने साजरी करण्यात यावी यासाठी निवेदन दिले होते परंतु आम्हाला पालिकेच्या वतीने शासनाचा दि. ११ नोव्हें २०१७ चा जीआर समोर करून या पुढे शहरात कोणत्याच जयंतीला निधि दिला जाणार नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर अनेक महापुरुषांच्या जयंती निमीत्त संस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम पालिकेच्या वतीने उत्साहात साज-या करण्यात आले. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला, याचे आम्ही स्वागत करतो, परंतू यावर्षी पासून शिवजयंती निमित्त शहरातील सर्व शाळांमध्ये “शिवसप्ताह” साजरा करण्यात यावा. यामध्ये आपल्या शाळेत बालशिवाजी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोवाडा गायन स्पर्धा, या सर्व स्पर्धोचे नियोजन करण्यात यावे. व तसेच शाळेतील विजेत्या स्पर्धकांना शिवचरित्र पुस्तक, स्मृतीचिन्ह मानधन देण्यात यावे. तसेच शिवजंतीच्या निमित्ताने भक्ति-शक्ति उद्यान निगडी येथे तीन दिवस उत्साहात प्रबोधंनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे यासाठी काल दि.१७/०१/२०१९ रोजी सकल मराठा समाज व शिवप्रेमी कार्यक्रत्याचे शिष्टमंडळ घेऊन आपणांस भेटण्यासाठी आम्ही सर्व महापालिकेत आलो होतो.
त्यावेळी आपण महापालिकेत नव्हता तो पर्यंत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, म.न.से गटनेते सचिन चिखले यांना आमचे शिष्टमंडळ भेटले. त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन आमच्या शिष्टमंडळाला प्रतिसाद दिला. मात्र आपण आपल्या महापौर कक्षात आल्यानंतर आम्ही आपल्या दालनात आलो असता. आपण काही लोकांसोबत अँटीचेंबरमध्ये बसलेले होता. त्यावर आम्ही आपणांस आम्हाला आपल्याला निवेदन द्यायचे आहे आपण कृपया बाहेर येऊन आमच्याशी चर्चा करुन निवेदन स्वीकारा अशी आम्ही आपल्याला विनंती केली. त्यावर आपण लगेच बाहेर आलात मात्र तुमच्या महापौराच्या खुर्चीवर न बसताच आमच्याशी चर्चा करु लागलात. त्यावर आम्ही मागच्या वर्षी शिवजयंती महापालिकेच्या वतीने भक्ति-शक्ति उद्यान निगडी येथे साजरी करावी अशी मागणी केली असता शासन निर्णयाचा संदर्भ देत महापालिकेने कुठलाही कार्यक्रम राबविला नाही. त्यामुळे आम्ही कार्यक्रत्यांनी स्वखर्चाने शिवजयंती साजरी केली. मात्र त्यानंतर महापालिकेने वर्षेभर अनेक महापुरषांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेतले. त्याचे आम्ही स्वागत करतो, मात्र यावर्षी महापालिकेने १९ फेब्रुवारी ला वरील सुचनाप्रमाणे शिवजयंती साजरी करावी अशी विनंती आपल्याला मी केली. त्यावर आपण उभ्या- उभ्याच अत्यंत तुच्छेतेने शासन निर्णय व कायद्याप्रमाणे शक्य् असेल ती मदत मी तुम्हाला करेल, नाही तर मारुती भापकर यावर आम्हाला लगेच पत्र काढुन विरोध करतील असे बोललात. हे बोलत असताना आपली बॉडीलॅग्वेज सकारात्मक तर नव्हती आणि आपण आपल्या अँटीचेंबरमध्ये निघुन गेलात. यावर आपल्या वागण्याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहेत.
मा. महापौर साहेब गेली ३० वर्षे सार्वजनिक जीवनात काम करीत असताना शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ या महापुरुषांच्या जयंती उत्सव सांकृतिक कार्यक्रमाला आम्ही कधीही विरोध केला नाही. उलट या महापुरुषांच्या पाईक म्हणून या उत्सवामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमामधे सक्रीय कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो. आमचा विरोध अशा कार्यक्रमाला नव्हता, व यापुढेही नसणार मात्र, महापालिकेतील गैरकारभार व भ्रष्टाचार याला मात्र यापुर्वी ही विरोध केला, व यापुढे ही विरोध करणार. त्यामुळे आपण मला त्या शिष्टमंडळासमोर बदणाम करण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न आपण कृपया पुन्हा करु नये. असेही भापकर म्हणाले आहेत.
हे उत्सव कुणाच्या खिशातील पैशातून होत नसून शहर वाशीयांच्या पैशातून होत असतात. आपण सर्व मालक नसून जनतेचे सेवक आहोत हे कायम लक्षात ठेवा. आपण महापौर पदावर विराजमान होत असताना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा वेश परिधान करुन पदभार स्वीकारला. त्याच महात्मा फुले यांनी प्रथम छत्रपती शिवरायांची रायगडावरील समाधी शोधून काढून शिवजयंती सुरु केली. तसेच शिवरायांवर विर्स्तीर्ण पोवाडा रचला. त्यांचे आम्ही सर्व अनुयायी आहोत. त्यामुळे संकुचित विचारसरणीतुन बाहेर पडून सर्व समावेषक बनण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला पाहीजे.
त्यामुळे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती त्या निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम भक्ति-शक्ति उद्यान निगडी येथे तीन दिवस आयोजित करुन व सर्व शाळामधून “शिवसप्ताह” साजरा करण्यात यावा व यासाठी शहरातील प्रथम नागरिक महापौर म्हणून आपण पुढाकार घ्यावा असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.











