- अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीच्या त्या तारखा बोगस..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकांची मुदत येत्या मार्च २०२२ ला संपत आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचनेचे आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जय्यत तयारी सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम आणि आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर केल्याचा बोगस आदेश सोमवारी (दि. १८) व्हायरल झाला आहे .
त्याची नगरसेवक, इच्छुकांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा असा कोणताही आदेश आला नसून, बनावट आदेश व्हायरल होत असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले.