- उपहारगृहे आणि दुकानांच्या वेळमर्यादेत वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२१) :- राज्य सरकारने कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वर्षा निवासस्थानी राज्यातील टास्क फोर्सची आज मुख्यमंत्र्यांसोबच सविस्तर चर्चा झाली.
यावेळी राज्यातील उपहारगृहे, दुकानं आणि अम्युझमेंट पार्कविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच, लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
राज्य सरकारने राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरू केली जाणार आहेत. वेळ वाढवण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत इतर राईड्ससाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पाण्यातल्या राईड्सबाबत नंतर निर्णय घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत.