न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जाने.) :- जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) व दि शेतकरी शिक्षण मंडळ (टिएसएसएम) संचलित बावधन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी शैक्षणिक संकुल येथे (दि. २२ व २३ जाने.) दि २२ रोजी स १० वा “टेक्नोथॉन २०१९” या स्पर्धात्मक व तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आभियांत्रिकीच्या तांत्रिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुखता भावना निर्माण व्हावी. तसेच तंत्रशिक्षणाचे उपाय योजना सामाजिक समस्या निर्मुलनासाठी करण्याची क्षमता विकसीत व्हावी, या हेतूने टेक्नोथॉन १९” या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन केले, असल्याची माहिती प्राचार्य सी.एम. सेदाणी यांनी दिली.
यावेळी अमरावतीच्या गर्व्हमेंट कॉलेज ऑफ इंजिनियरींगचे माजी प्राचार्य डॉ बी. एन. जाजु, सी.ओ.ई.पीच्या गव्हर्नन्स समितीचे माजी संचालक उद्योजक प्रा. विकास पाटील, द शेतकरी शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. गिरिराज सावंत, जेएसपीएमचे विश्वस्त प्रा. ऋषीराज सावंत, पीव्हीपीआयटीचे कॅंपस संचालक प्रा. शशिकांत थिटे उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय पातळीवर तांत्रिक महोत्सवात या वर्षी स्मार्ट ट्रान्सपोर्टशन ही टेक्नोथॉनची मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. या तांत्रिक महोत्सवात दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील दीडशेहून अधिक महाविदयालयातून ३००० पेक्षा जास्त विदयार्थी सहभागी होऊन, या महोत्सवाचा आनंद लुटतात. दरवर्षी या इव्हेंट मध्ये १७ हुन, अधिक तांत्रिक स्पर्धामध्ये विदयार्थी तंत्रज्ञानाचे कौशल्यपणास लावुन क्षमता आजमावतात. यावर्षी मॉडेल मेकिंग, डी.बी. मॅनिया, लेथ वॉर, रोबो रेस्टलींग, फिलमेकिंग व डाउजींग वर्कशॉप या सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सव आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक, सचिव तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे प्रोत्साहन आणि अमुल्य मार्गदर्शन लाभले. आयोजनासाठी पीव्हीपीआयटी बावधन संकुल संचालक प्रा शशिकांत थिटे, प्राचार्य सी. एम. सेदाणी, समन्वयक स्थापत्य आभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. रविराज सोरटे आणि यांत्रिकी आभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ कमलेश सोरटे, आणि विदयार्थी प्रतिनिधी निनाद बापट, शुभम सहाणी, विश्वराज सिसोदीया, तेजस भोसले, अजिंक्य जायभाये यांनी विशेष परिश्रम घेतले.















