- दुकानदाराच्या नकळत गल्ल्यावर मारला हात; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२१) :- बेलठीकानगर येथील कन्हैया पार्कमधील गणेश व्हरायटी नावाच्या दुकानात बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन अनोळखी इसम झाडू खरेदी करण्याच्या बहाण्याने आले.
त्यातील एकाने फिर्यादीला झाडू दाखविण्यात व्यस्त ठेवले आणि दुस-या इसमाने दुकानाच्या काऊंटर मधून २२ हजारांची रोख रक्कम चोरली. त्यानंतर दोन्ही चोरटे झाडू खरेदी न करता निघून गेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.
उदयराम पुनाराम चौधरी (वय २३, रा. बेलठीकानगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी बुधवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















