- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२१) :- फिर्यादीच्या मैत्रिणीच्या मानलेल्या मामाने फिर्यादी आणि त्यांची १६ वर्षीय मावस बहीण यांच्याशी अनेकवेळा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी आणि त्यांच्या मावस बहिणीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून त्यांच्याशी गैरवर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना जून आणि २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान मोशी आणि मुंबई येथे घडला. पीडित महिलेने बुधवारी (दि. २७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















