- पालिकेकडून विस्तारीकरणावर जवळपास दीड कोटींचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२१) :- महापालिकेच्या वतीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहे.
पोलीस आयुक्तालयांतर्गत भोसरी पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे अस्तित्वात आले. सुरुवातीला एका खासगी इमारतीतून पोलीस ठाण्याचा कारभार सुरू झाला. त्यानंतर स्पाइन रस्त्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याची स्वतंत्र प्रशस्त इमारत उभारण्यात आली. महापालिकेच्या वतीने पोलीस ठाण्याच्या या इमारतीचे आता विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. १ कोटी ६२ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टिंग शुल्क वगळून १ कोटी ५९ लाख रुपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार तीन ठेकेदारांनी निविद सादर केल्या. त्यापैकी श्रीगणेश कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने निविद दरापेक्षा १३.९० टक्के कमी दराने निविदा सादर केली.












