- महिलेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२१) :- आरोपीचे लग्न झालेले असतानाही फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. फिर्यादी महिलेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता तिला उडवाउडवीची उत्तरे दिली.
ग्न करण्यास नकार देऊन फिर्यादी महिलेला आरोपीने शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार जून २०२० ते १ नोव्हेंबर २०२१ दरम्यान वाकडमध्ये घडला. पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार रोहिदास मस्कर (वय ३२, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












