- शब्द पब्लिसिटीच्या धनश्री दिवाळी अंकाचे पिंपरीत प्रकाशन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२१) :- देव- देवत्व हे मानव जातीला जोडणारे संचित आहे. मात्र, मानवाने जगाच्या कल्याणासाठी कार्य करणारे देव, साधू संत आणि महापुरुषांना आपल्या सोयीनुसार जातीच्या चौकटीत बंदिस्त केले. देवदेवतांची वाटणी करणे हे संस्कृतीचे पाप आहे, असे परखड मत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
शब्द पब्लिसिटी निर्मित धनश्री दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ सबनीस यांच्या हस्ते पिंपरी येथील आयपीएस कॅंपस मध्ये करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डीचे संचालक डॉ. नीरज व्यवहारे, कुदळे ग्रूपचे अध्यक्ष डॉ. दीपक कुदळे, एएसएम संचलित आयपीएस कॅंप्सचे संचालक डॉ. सुधाकर बोकेफोडे, धनश्री दिवाळी अंकाचे संपादक शिवाजी घोडे आदी उपस्थित होते.
शब्द पब्लिसिटीच्या वतीने ७० टक्के विकलांग पृथ्वीराज इंगळे या स्पेशल गायकास मास्टर ब्लास्टर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. दीपक कुदळे यांनी संपादक शिवाजी घोडे व रेखा घोडे या दांपत्याचा विशेष सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे यांनी तर, सूत्रसंचालन अमोल मोरे, आभार धनश्री घोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कामगार नेते काशीनाथ नखाते, रेखा घोडे, श्रीकृष्ण पादिर, बाबा शिंदे, विशाल फडतरे, दत्ता गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.












