- वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त पालिकेचे अभिवादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे राज्यात शेती, सहकार, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे थोर राजकारणी होते, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या सांगवी येथील पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन रावसाहेब मिसाळ, प्रदीप जाधव,सचिन गायकवाड, विजय कोपरे,रमेश कर्डीले,अजय असूटकर,विजय सिंग,अर्चना राणे,अंजू नायर आदी मान्यवर उपस्थित होते.












