- थेरगाव व रावेतमधील घटना; आरोपीविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) :- जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीला त्याच्या घरी बोलावून घेतले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. वारंवार त्याच्या राहत्या घरी व रावेत येथे लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले.
फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे एकाच ठिकाणी नोकरीस असल्याने त्यांची मैत्री होती. फिर्यादीने आरोपीला लग्नाबद्दल विचारणा केली असता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले असल्याचे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्यावेळी फिर्यादीस प्रचंड धक्का बसला. फिर्यादीची इच्छा नसताना आरोपी हा फिर्यादी सोबत जबरदस्ती करू लागला.
फिर्यादीने त्यास विरोध केला असता आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. थेरगाव तसेच रावेत येथे १३ मार्च २०२० ते १२ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान ही घटना घडली. पीडित २६ वर्षीय तरूणीने शनिवारी (दि. १३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गणेश सुधाकर पारटकर (वय २६, रा. थेरगाव) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.












