- बनावट ऑनलाईन व्यवहाराचा फोटो दाखवत चोरलं सोन्याचं नाणं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) :- चिंचवड येथील चंपालाल गुलाबचंद वर्मा ज्वेलर्समध्ये गुरुवारी (दि. ११) वर्मा ज्वेलर्समध्ये बनावट ऑनलाईन व्यवहाराचा फोटो दाखवत अज्ञात चोरट्याने ज्वेलरी स्टोअर मधून २५ हजार ३५० रुपये किंमतीचे सोन्याचे नाणं चोरुन नेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सुनील प्रल्हाद वर्मा (वय ३८, रा. चापेकर चौक, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरटा ज्याचे बिलावरील नाव नितीन सुधीर जैन या इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.












