- व्यवस्थापनाकडून उडवाउडवीचे उत्तर; तपासणीची होतेय मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) :- तळवडे रस्त्यावरील त्रिवेणीनगर परिसरातील हुमा बेकरी येथील अन्न पदार्थावर चक्क झुरळांचा वावर आढळून आला आहे. येथील टोस्ट, क्रीमरोल आणि मस्का पाववर झुरळं असल्याचे निदर्शनास आले.
विक्रीसाठी ठेवलेल्या ट्रेमधील खाद्य पदार्थावरच काही झुरळं मेलेल्या अवस्थेत दिसत होते. ब्रेड व इतर बेकरी पदार्थावर तारीख किंवा कोणत्याही प्रकारचे लेबलदेखील नव्हते.
याबाबत बेकरी व्यवथापनाकडे विचारणा केली असता ‘झुरळ सगळीकडेच असतात, घरीसुद्धा असतात’, असे टोलवाटोलवीचे उत्तर मिळाले. अन्न व औषध प्रशासन तसेच अन्न सुरक्षा अधिकारी यांनी या बेकारीची तपासणी करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.












