- पिंपळे निलखमधील घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) :- पिंपळे निलख येथील खंडोबा मंदिर चौक परिसरातुन दोन गायी गाडीत भरुन रक्षक चौक, पिंपळे निलख येथील आर्मीच्या मोकळ्या मैदानात उतरल्या. त्यांनी तेथे गायींची कत्तल करून त्यांचे मांस गाडीत भरुन नेले.
फिर्यादी यांनी आरोपींचा पाठलाग केला असता त्यांना पिस्तूल व लोखंडी टॉमी दाखवला, असे फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी (२) रोजी रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
शुक्रवारी (दि. १२) रोजी सत्यवान नारायण कामठे (वय ३४, रा. गणेश नगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.












