- मुलगी गंभीरपणे भाजली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२१) :- घरासमोर वाळत घातलेले कपडे काढत असताना घराजवळ असलेल्या डीपी बॉक्सचा १३ वर्षीय मुलीला शॉक लागून ती गंभीरपणे भाजली आहे.
तिला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंकिता जयश्री काळे (वय १३, रा. गोडाऊन चौक, भोसरी) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (दि. १७) सकाळी घडला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.