- सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण आणि औषधनिर्माणशास्रसह विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) वाढवली आहे.
सीईटी सेलने प्रवेशासाठी मुदतवाढीचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी २३ नोव्हेंबर, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी (बी.ई., बी.टेक.) अभ्यासक्रमांसाठी २१ नोव्हेंबर, वास्तुकला (बी.आर्च, डी.एस.ई) अभ्यासक्रमांसाठी २० नोव्हेंबर आणि व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए, एमएमएस) अभ्यासक्रमांसाठी २२ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.