- पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; नेहरूनगरमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२१) :- पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून वाद होत होता. त्यातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील पाटा घालून ठार केले. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतः पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला.
हा प्रकार आज मंगळवारी (दि. २३) सकाळी पिंपरीतील नेहरूनगर येथे घडला. जेनल अजमुद्दीन चाकोरे (वय ३५, रा.रसरंग चौक, नेहरूनगर, पिंपरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
अजमुद्दीन अल्लाउद्दीन चाकोरे (वय ३८) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.