- कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, सेवानिवृत्त (पेन्शनधारक) आणि मानधनावरील, ठेकेदारी पद्धतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कर्मचाऱ्यांनी तत्काळ लसीकरण करुन घ्यावे. लस घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे, असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
महापालिका आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात (शिक्षक, कर्मचाऱ्यांसह) ७ हजार ४७९ अधिकारी, कर्मचारी कामकाज करीत आहेत. कोरोनाचा तत्काळ प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी महापालिका विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येतात.
यापूर्वीच्या दोन लाटांचा पूर्वानुभव विचारात घेता तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे. कोरोना आजारापासून संरक्षण मिळावे याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्र उभारले आहेत.