- कोरोनाचा धोका वाढला; आज ५९० बाधित; एकही मृत्यू नाही; २७ रुग्ण मुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ५) रोजी ५९० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २८०५१२ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७५३४९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्राँनचे ०६ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. ०६ पैकी ०३ पुरुष व ०३ महिला आहेत. या ६ पैकी १ रुग्ण जपान, १ रुग्ण सिंगापुर, १ रुग्ण केनिया, १ युएसए व २ युएई येथुन आलेले आहेत. या ६ रुग्णांपैकी ४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असुन उर्वरीत २ रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
एकूण ७३ कोविड- १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ५७ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.