- सरकारी कामात अडथळा; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- भोसरीतील गुडलक चौकात भोसरी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई कर्तव्यावर हजर होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. ‘चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तुम्ही पोलीस काय फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का’ असे आरोपीने म्हटले.
चौकात झेब्रा क्रॉसिंग असून तू त्यावरून निघून जा, असे फिर्यादी पोलिस यांनी आरोपीला सांगितले. त्याचा आरोपीला राग आल्याने ‘चौकातील सर्व सिग्नल बंद करा मला जाऊ द्या, असे म्हणून फिर्यादींसोबत त्याने अरेरावी केली.
फिर्यादी यांना धक्काबुक्की करून फिर्यादी यांच्या शर्टाची नेमप्लेट तोडून त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. ३) रात्री आठ वाजता घडली. पोलीस शिपाई दिनकर महाडिक यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.