- कामे उरकण्याच्या महापौरांकडून संबंधितांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी काही पूर्ण तर अनेक प्रकल्प अपूर्ण असून हे प्रकल्प नागरिकांसाठी खुले करून देण्यासाठी या प्रकल्पांचे उर्वरित कामे पूर्ण करून ते महापालिकेच्या संबंधित विभागांकडे हस्तांतरित करा, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी केल्या.
पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या एबीडी व पॅन सिटी प्रकल्पांची पाहणी केली. पहिल्या दिवशी पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरातील एबीडी अंतर्गत असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. या वेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सचिन चिखले, शहर अभियंता तथा सह मुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, सहशहर अभियंता अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, नितीन कदम उपस्थित होते.
विकास कामांची प्रगती, प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा कालावधी त्यासाठी उपलब्ध निधी यासंदर्भात चर्चा करून उपलब्ध निधीतून अपूर्ण कामे पूर्ण करावीत. तसेच प्रस्तावित कामांबाबत चर्चा केली. त्यानंतर, पिंपळे गुरव येथील जिजामाता उद्यान, परिसरातील रस्ते, चौकांमध्ये सुरू असलेली कामे, कृष्ण विहार चौक येथील प्लेस मेकिंग, चिल्ड्रेन प्ले ऐरिया, सुदर्शन चौकातील सेव्हन स्टार रोडच्या कामांना भेट दिल्या.