न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जाने.) :- सोशल फांऊडेशन प्रणित अखिल भारतीय मानव अधिकार बेळगाव जिल्हा यांच्या वतीने रविवार (दि. २७) रोजी बेळगाव येथे नियाज हॉटेल हॉल मध्ये कर्नाटक राज्यस्तरीय प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विध्याभुषण. डॉ.प्रशांत पगारे, अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक डॉ. अशोक शिलवंत, बेडकीहाळ ग्रा. पं. चेअरमन शारदा जाधव, संपादक व व्रुतपत्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पुणे डी. एस. डोणे, मिनाक्षी डोणे, प्रा. डी. एन. दाभाडे लातुर, अभिनेत्री पद्मजा खटावकर रत्नागिरी, इग्लिंश मिडीयम एच. एम. बेडकीहाळ, दिपाली जालीहार, वेलफेअर ऑफीस जिल्हाधिकारी एस. एस. बडीगेर, लॉर्ड बुध्दा टी. व्ही. चँनेल प्रतिनिधी अकोला मनिष खर्चे, पी. आर. पी. सरचिटनीस कोल्हापुर विध्याधर कांबळे, सामाजिक कार्यकर्ता मेघा देसाई, ग्रा. पं. सदस्या कोगनोळी, शर्मिला पाटील, अनिल पाटील, पत्रकार कोगनोळी, नेताजी गोरे खचनाळ, प्रकाश कांबळे खचनाळ, अनिल शिंगे या सर्व मान्यवरांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, प्रमानपत्र देऊन सन्मानपुर्वक गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार डॉ. अशोक शीलवंत यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल देण्यात आला. हा कार्यक्रम फांऊडेशन अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांच्या नेत्रुत्वामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
स्वागत व प्रास्ताविक विक्रम शिंगाडे यांनी केले. तर आभार सुशिल कांबळे यांनी मानले. सुत्रसंचालन बी. जी. देशमुख यांनी केले.











