न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जाने.) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत आज बुधवार (दि. ३०) रोजी शहरातील पाच सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
सुरेश ऊर्फ चिम्या शांताराम निकाळजे (वय ४२, रा. आदर्शनगर, पिंपरी), चंद्रकांत अनंत माने (वय २६, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव), सुदर्शन ऊर्फ पिन्या संभाजी राक्षे (वय २२, रा. रामनगर कॉलनी, शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी), सोमनाथ ऊर्फ तम्मा हनुमंत लष्करे (वय २१, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), निलेश भाऊसाहेब कोळपे (वय ३१, रा. शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
शहरात गुन्हेगारीच्या माध्यमातून आपली दहशत निर्माण करणाऱ्या या पाच सराईत आरोपींना एकाच दिवशी तडीपार करण्याच्या, या कारवाईमुळे शहरात काही काळ का होईना शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे.











