न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २१) रोजी ५१८२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २५६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३१८२९९ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २९१००३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५३५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०२ एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्रोनचा १ नवीन रुग्ण आढळला असून ती महिला आहे. हा रुग्ण रॅण्डम तपासणीमध्ये ओमायक्रॉन बाधित आढळून आलेले आहे. या रुग्णाची १० व्या दिवशी पुन्हा तपासणी केली असता त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
एकूण १०८ कोविड- १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी १०४ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.