न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२२) :- शाहूनगर येथील गुरुध्वज फाउंडेशनच्या वतीने पिरॅमिड हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन शहर सुधारणा समिती सभापती व नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शाम हरकरे, संचालक सीए राहुल कुलकर्णी, राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे श्रीराम कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. शंभरपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी सहकार्य केले. पंकज दलाल, किरण भिरुड, सुमित ठाकूर, वैभव हरकारे, गुरुराज कुंभार, परग केळकर आणि डॉ. राऊत मारे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.


















