न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२२) :- संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहण केले.
याप्रसंगी समीर जेऊरकर, प्राचार्य मानसी हसबनीस आणि ऑनलाइन माध्यमातून दीड हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑनलाइन माध्यमातून विविध कलांचे प्रदर्शनही केले.