- पिंपळे सौदागरमधील घटना; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२२) :- इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडिंग ब्रोकर कंपनीत गुंतवणूक केली. गुंतवणूक केलेल्या रकमेवर प्रत्येक महिन्याला फायदा करून देण्याचे आरोपींनी आमिष फिर्यादी यांना दाखवले.
त्यानंतर फिर्यादी यांना दरमहा कोणतीही रक्कम दिली नाही व गुंतवलेली रक्कम परत न देता कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर या ऍपवर बनावट व खोटा अभिलेख तयार केला. त्यातून फिर्यादी आणि अन्य लोकांची एकूण आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने सोमवारी (दि. २४) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १ सप्टेंबर २०२१ ते २७ जानेवारी २०२२ या कालावधीत रेनबा प्लाझा, पिंपळे सौदागर येथे घडली. इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडिंग कंपनीचे डायरेक्टर जय मावजी, निजय मेहता, निकुंश शहा, निलेश शांताराम वाणी अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महेश मुरलीधर शिंदे (वय ४४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















