- छेडछाडीची तक्रार पोलीसात दिल्याने घेतला बदला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२२) :- हातोड्याने १७ वर्षीय मुलीच्या डोक्यात अनेक घाव घालून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये फिर्यादी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी १७ वर्षीय मुलीने आरोपीच्या विरोधात छेडछाडीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या रागातून त्याने हे कृत्य केले.
ही घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या कालावधीत बाजार गल्ली रोड, तळेगाव दाभाडे येथे घडली. जखमी १७ वर्षीय मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम विनोद शेळके (वय २०, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे.
















