- निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- निगडीतील प्राधिकरण येथे पोस्टातील पत्र वाटपाचे सरकारी कर्तव्य पार पाडत असताना काहीही कारण नसताना आरोपी मायलेकींनी संगणमत करून फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली.
तसेच धमकी देऊन मारहाण केली. शुक्रवारी (दि. २८) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी माय-लेकीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अंगावर धावून येऊन साथरोग नियंत्रण अधिनियमाची पायमल्ली करून आरोपींनी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला,असे फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.















