न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२२) :- खेड तालुक्यातून हजारो नागरिक रोज पिंपरी, चिंचवड, भोसरी एमआयडी परिसरात कामानिमित्त ये-जा करीत असतात. त्या पैकी वडगाव घेनंद, शेलपिंपळ गाव, पाबळ या भागातील नागरिकांना येण्या – जाण्यासाठी पीएमपीएमएलची व्यवस्था नव्हती.
आ. महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने गुरुवार (दि. १७ फेब्रवारी) पासून भोसरी ते पाबळ ; संतनगर (प्राधिकरण मोशी) ते कात्रज (गुजरवाडी) आणि निगडी ते आळंदी या मार्गांवर पीएमपीची सेवा सुरु करण्यात आली. आ. महेश लांडगे यांच्या हस्ते या तीनही मार्गांवरील बसला हिरवा झेंडा दाखवून गुरुवारी लोकार्पण करण्यात आले.
असा आहे बस मार्ग…
क्र. २६४ भोसरी ते पाबळ हा मार्ग भोसरी – आळंदी रोड – मॅगझिन चौक – आळंदी – वडगाव घेनंद – शेलपिंपळगाव – केंदूर चौफुला फाटा मार्गे पाबळ असा आहे. बस मार्ग क्र. ३३९ संतनगर (प्राधिकरण मोशी) ते कात्रज (गुजरवाडी) हा मार्ग संतनगर चौक – भोसरी – नाशिक फाटा – कासारवाडी – बोपोडी – वाकडेवाडी – जंगली महाराज रोड – टिळक रोड – स्वारगेट – कात्रज मार्गे गुजरवाडी असा आहे आणि बस मार्ग क्र. ३४० निगडी ते आळंदी हा मार्ग निगडी – घरकुल – स्पाईन रोड – संतनगर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक (गोडाऊन चौक) – खडी मशीन रस्ता – वडमुख वाडी – अलंकापुरम सोसायटी – पुणे आळंदी रस्ता मार्गे आळंदी असा आहे. निगडी, भोसरी, चिखली – मोशी, प्राधिकरण, च-होली, आळंदी, वडगाव घेनंद, शेलपिंपळगाव, पाबळ तसेच भोसरीतून कात्रज पर्यंत प्रवास करणा-या प्रवाशांना या नविन बस मार्गाचा उपयोग होईल.











