- तिघांवर गुन्हा दाखल; चिंचवडमध्ये पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- व्हाटसअपवरून आरोपी हा वेगवेगळ्या मुलींचे फोटो गिऱ्हाईकांना पाठवून वेश्यागमनासाठी मुलींची निवड करण्यास सांगत होता. त्यानंतर गिऱ्हाईकांना वेगवेगळ्या हाॅटेलवर बोलवायचा. त्यानंतर हाॅटेलवर आरोपी हे संबंधित पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होते.
आरोपी हे ऑनलाईन पद्धतीने सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी चिंचवड येथील हाॅटेल कामिनी येथे कारवाई केली. यात दिल्ली येथील दोन व छत्तीसगड राज्यातील एक, अशा एकूण तीन पीडित महिलांची सुटका केली.
तसेच चार हजार ६०० रुपयांची रोकड व किमतीचे इतर साहित्य, असा एकूण चार हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही कारवाई केली. जॅक, बबलू, आणि करण यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
















