न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२२) :- नोव्हेल इन्स्टिट्युटस् पुणेचे अध्यक्ष अमित गोरखे यांना कर्तव्यम सोशल फाउंडेशन,महाराष्ट्र यांच्या वतीने कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार २०२२, राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
अमित गोरखे यांनी कोरोना काळात केलेली मदत, नोव्हेल शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत केलेले शैक्षणिक काम तसेच कलारंग सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून आजवर सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान या कामासाठी हा पुरस्कार त्यांना दिला गेला. सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असतात, राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी नेहमी ते धावून जातात महाराष्ट्रभर त्यांचे काम जोमाने सुरू आहे. ते भाजपाचे प्रदेश सचिव आहेत. या आधी २०१२ साली भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संतोष बारणे यांनी सर्वांचे स्वागत केले. क्रांती महाजन यांनी आभार मानले.











