न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- संशयितपणे फिरताना आरोपी आढळून आला. पोलिसांनी त्याला अडवून त्याची चौकशी केली. त्यावेळी आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची आणि गाडीची झडती घेतली. त्यावेळी सीटखाली एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
मंगळवारी (दि. १५) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान चऱ्होलीतील शंकराच्या मंदिराजवळ ही घटना घडली. पोलीस हवालदार नामदेव वाडेकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरुण उर्फ किरण धनराज पवार (वय २७, रा. तुळापुर, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.











