न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- चिखली घरकुल येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण व पदपथ दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी पालिकेच्या झोनीपू विभागाकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दुर्वांकुर सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय चोरमले, कुमार होले आदी उपस्थित होते.
चिखली घरकुल येथे दुर्वांकुर हौ सौ बिल्डिंग नं. एफ २० व परिसरात साप, उंदीर, घूस व इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे येथील पदपथाची दुरुस्ती करून रस्त्याचे काॅक्रेंटीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.












