न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी तंबाखु, सिगारेट, बिडी, गोवा-गुटखा, पानमसाला यांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व धुम्रपानाची प्रतिकात्मक होळी संत तुकाराम नगर येथे दुपारी ०२:०० वाजता शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कु. वर्षा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.
मायला खत्री, राजेंद्र भूते, पोर्णिमा कोल्हे, नेहा पडवळ, मेघना जगताप, प्रतिक अलिबागकर,चैतन्य सपकाळ, अमन शिकलगार, प्रज्वल जगदाले, आशीष शितोले, गौरव ढोरे, प्रथमेश जगताप, पवन गायकवाड, गणेश गायकवाड, वेदांत जगताप, सौरव ढेरे, साहिल जाधव, सुरज जाधव, रितेश बुरुड पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












