- आगीत आठजण जखमी; केमिकलच्या बॅरलमुळे दुर्घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- मोशी येथील डी मार्ट समोरील भंगाराच्या गोदामाला आग लागली. काही जण आगीत अडकले असल्याची माहिती मिळाली. मुख्य अग्निशामक केंद्रातील तसेच चिखली अग्निशामक उपकेंद्रातील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
केमिकलचे बॅरल स्वच्छ करत असताना हा स्फोट झाला. या आगीत आठ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. १७) सकाळी मोशी येथे घडली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गोदामामध्ये केमिकलचे बॅरल स्वच्छ करण्याचे काम ग्राउंड फ्लोअरला चालत होते. गोदामामध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना केली नसल्याचेही दिसून आले, अशी माहिती अग्निशामक विभागाने दिली.


















