न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी राकेश शेडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत विद्यार्थी शहराध्यक्ष यश साने, अरुण बोराटे, माजी नगरसेवक सचिन चिंचवडे आदी उपस्थित होते. पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी स्वतः लक्ष घालून नवीन युवकांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यास सुरूवात केली.
विद्यार्थी संघटनेतूनच नवीन कार्यकर्ते तयार होत असतात. त्यामुळेच महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांमध्ये पक्षाची विचारधारा पोचविण्यासाठी नवीन युवकांची नेमणूक केली जात आहे.












