न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी येथील पशुवैद्यकीय विभागामार्फत पाळीव प्राण्यांवर उपचारासाठी सुरु असलेला बाह्यरुग्ण विभाग १ एप्रिलपासून स्थलांतरित करण्यात येणार आहे.
नेहरुनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्र (डॉग पाउ॑ड ) गवळी माथा रोड, अनुकुल कंपनी समोर स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे यांनी दिली.