न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२२) :- टाटा मोटर्स कंपनीत फिर्यादीच्या व त्यांच्या मित्राच्या मुलींना कामाला लावतो, असा विश्वास संपादन करून फिर्यादीची ऑनलाइन आणि रोख असे एकूण तीन लाख ९५ हजारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
आरोपीने व्हाट्सअपवर टाटा मोटर्स कंपनीचे बनावट ज्वाइनिंग लेटर आणि दस्तावेज पाठवले तेव्हा आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं फिर्यादीत म्हटल आहे.
विजय तांबे (वय ३८ वर्षे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिसात तक्रार दखल केली आहे. फारुख अहमद अली लासकर (वय ४० वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.