न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२२) :- सायकल पेट्रोलिंग पुन्हा सुरू करण्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले आहेत. गुरुवार (दि. ३१) पासून पुन्हा सायकल गस्त सुरू झाली आहे.
पोलिसांनी वाहनांऐवजी सायकलवरून गस्त घालावी यासाठी पोलिसांना सायकलींचे वाटप केले आहे. मात्र या सायकलला मडगाड नसल्याने पावसाळ्यात या सायकल पोलिसांनी अडगळीत ठेवून दिल्या. हिवाळ्यातही या सायकल गस्तीसाठी बाहेर काढल्या नाहीत. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बिनतारी संदेशवरून सर्व पोलीस ठाण्यांना सायकलवरून गस्त घालण्याचे आदेश दिले.
सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत दिवसपाळीतील कर्मचारी सायकलवरून गस्त घालतील, तसेच रात्रपाळीसाठी आलेले कर्मचारी, आठ ते दहा वाजेपर्यंत गस्त घालतील. याशिवाय पहाटे चार ते सहा वाजताच्या दरम्यान पोलिसांचे ‘ गुड मॉर्निंग ‘ पथकही सायकलवरून परिसरात गस्त घालतील, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.