- आरोपी अटकेत; एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२२) :- रावेत येथील शिंदे वस्ती येथे जय मल्हार गॅस रिपेअरींग नावाचे दुकान आहे. गॅस विक्रीचा व रिफिलिंगचा कोणताही शासकीय परवाना नसताना आरोपीने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरला. यातून शासनाची व ग्राहकांची फसवणूक केली.
पोलिसांनी येथे केलेल्या या कारवाईत गॅससह टाक्या, रिफिलिंग करण्याचे साहित्य व रोकड असा एकूण १९ हजार ३४३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग करण्यास एकाने जागा उपलब्ध करून दिली.
गणपती चनप्पा मलिशे (वय २५, रा. शिंदे वस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून अमोल बाळकृष्ण भोंडवे (वय ३०, रा. शिंदे वस्ती, रावेत) याच्यावर गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.